Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद जोरात पेटला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्यासोबत फोनवर संवाद साधला.
या घटनांमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं फडणवीस यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आपण शेजारी शेजारी आहोत. शत्रू राष्ट्रासारखे एकमेकांवर हल्ले करायचे का. आमचं आम्हाला मिळेल, तुमचं तुम्हाला मिळेल. पण जर असं हातघाईवर आले तर दोन्हीकडून प्रतिक्रिया मिळतील. पण हे योग्य नाही. आम्ही केंद्राकडे अमित शहा यांच्याकडे आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्यापासून…”
- Eknath Shinde | सर्वसामान्य व्यक्ती सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसली हे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच – एकनाथ शिंदे
- Arvind Sawant | “नपुंसक पद्धतीने राज्य चालवलं जातयं”; अरविंद सावंतांचं राज्य सरकारवर टीकास्त्र
- Eknath Shinde | “हे उकसवायचं काम…”, कर्नाटकात महाराष्ट्राच्या वाहनांवर झालेल्या दगडफेकीवर एकनाथ शिंदे गटाची प्रतिक्रिया
- Ajit Pawar | “केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी तुमची सत्ता, मास्टरमाईंड कोण?” ; कर्नाटकप्रश्नी अजित पवारांचा सवाल