Devendra Fadanvis । नागपूर : राज्यातील तरुण तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis ) यांनी नुकतीच ही घोषणा केली आहे. आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात नुकतीच घोषणा केली होती. त्यानंतर २४ तासाच्या आतच गृहमंत्रालयाकडूनलगेचच हि घोषणा झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, केद्र सरकारच्या पार्श्वभूमीवर राज्यातही तरुणांना रोजगार दिला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
केंद्र सरकारने आजपासून दशातील सुमारे 10 लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 75 हजार तरुणांना रोजगार देण्याचे केंद्राचे लक्ष्य आहे. महाराष्ट्रातही त्याच धरतीवर रोजगार योजना राबविण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. नागपूर विमानतळावरुन प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचे केंद्राचे उद्दीष्ट आहे. पहिल्या टप्प्यात 75 हजार तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आरोग्य विभागातही मेगाभरती
सरकारी परीक्षेसाठी Government Exam तयारी करणाऱ्या नवयुवकांसाठी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र नोकरीची Job संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये राष्ट्रीय माहिती विज्ञान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रधारक उमेदवाराकडून पदानुसार अर्ज मागविण्यात येत आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन यांनी आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात घोषणा केली. आरोग्य विभागातील १० हजार १२७ जागांसाठी भरती प्रक्रियेचं वेळापत्रक त्यांनी जाहीर केलं. “१ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल. २५ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान अर्जांची तपासणी होईल. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान वैध ठरलेल्या अर्जांची यादी जाहीर केली जाईल. २५ मार्च आणि २६ मार्च या दोन दिवसांत परीक्षा घेतल्या जातील. २७ मार्च ते २७ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करून उमेदवारांची नेमणूक केली जाईल”, असं गिरीश महाजन यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “आनंदाचा शिधा वर, पैठणचा मिंधा…”, उद्धव ठाकरे गटाचा संदीपान भुमरेंच्या प्रतिमेवरुन खोचक टोला
- Devendra Fadanvis | मुंबई महापालिकेवर आपलाच भगवा फडकेल ; राज ठाकरेंच्या समोरच देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- Government Job Alert | राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Maharashtra Rain Update | राज्यात परतीच्या पावसात धूम, तर मराठवाड्यात पिकांचे मोठे नुकसान
- NCP | “…तर तलवारीने हात छाटण्याशिवाय राहणार नाही”, राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट इशारा