‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे’; फडणवीसांचा हल्लाबोल

devendra fadnavis

मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला घेरण्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. कोरोनाच कारण देत सरकारने केवळ ५ व ६ जुलै रोजी केवळ दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं आहे. यावरून भाजपने टीकास्त्र सोडलं आहे. आता अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी राज्यातील प्रश्न मांडून रणनीती आखण्यासाठी आज भाजपची आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीच्या समारोपाच्या भाषणात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे,’ असा टोला लगावत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव, श्रेयवाद आणि भ्रष्टाचार यावरून प्रहार केला आहे.

राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षांतील मतभेद आणि त्यामुळे निर्णयांवरून जनतेच्या मनात होणारा संभ्रम असे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना कोरोनाचं कारण देत अधिवेशन गुंडाळण्याच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक बाणा अवलंबला आहे.

अजित पवारांची सीबीआय चौकशी करा !

सचिन वाझेनंतर परमबीर सिंग यांनी देखील लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यासह शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळील व्यक्तीचं नाव घेत गंभीर आरोप केले होते. यानंतर, भाजपने अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करा, असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मांडला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP