Share

Devendra Fadnavis | ‘टीईटी’संदर्भात चौकशी करणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis | नागपूर : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सदस्य संजय कुटे यांनी उपस्थित केला होता यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा आरोप करत विरोधकांनी आज सभात्याग केला. सभागृहातील अनेक मंत्र्यांनी टीईटीत भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे तसेच सरकार त्यांना पाठिशी घालत आहे व त्यांच्यावर कारवाई करत नाही या निषेधार्थ सर्व विरोधक सभात्याग करत असल्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात सांगितले.

टीईटी परीक्षेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. यामध्ये विद्यमान आघाडी सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबावर एक आरोप केला जात आहे. ज्यामध्ये मंत्र्यांच्या मुलीची शिक्षिका म्हणून नियुक्ती हा टीईटी भ्रष्टाचाराचा भाग असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अब्दुल सत्तार यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. या चर्चेने सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत महाविकास आघाडीवर पलटवार केला.

देवेंद्र फडणवीसांकडून अब्दुल सत्तार यांना क्लीन चिट-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, टीईटी भ्रष्टाचार कोणाच्या काळात झाला? त्या काळात कोणाचे सरकार होते? महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात टीईटी भ्रष्टाचार झाला. ज्याने लाखो तरुण बुडाले. ज्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांसह अनेक लोक सामील होते. या प्रकरणात मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.

अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, मात्र त्यांच्या एकाही मुलीची टीईटी अंतर्गत नियुक्ती झालेली नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर टीईटी आयुक्तांनीही स्पष्टीकरण दिले आहे. पण, इथल्या कोणत्याही मंत्र्यावर बेलगाम आरोप करण्याची सवय आहे. आपल्या सत्तेच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार बाहेर काढणारा हा पहिलाच विरोधी पक्ष आहे. बॉम्ब-बॉम्ब म्हणत त्यांना लवंगी फटाकेही मिळाले नाहीत. अपात्र कंपनीला पात्र ठरवून TET परीक्षा कोणी घेतली?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या : 

Devendra Fadnavis | नागपूर : शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics

Join WhatsApp

Join Now