कोल्हापुरात आज रंगणार राजकीय फड

udhav Thackeray devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा: आज पश्चिम महाराष्ट्रात रंगणार आहे राजकीय फड कारण ‘तुझ माझ जमेना, तुझ्या वाचून करमेना’ जोडी अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. राज्याच्या राजकारणातील हे दोन दिग्गज नेते सरकार मध्ये एकत्र असले तरी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

आज सकाळी उद्धव ठाकरे हे बेळगावमध्ये विमानाने दाखल होणार असून त्यानंतर चंदगड, नेसरी , करवीर या भागांमध्ये त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर वारणानगरमध्ये नागरिकांशी संवाद असा कार्यक्रम ठेवण्यात आलाय.

पण हे दोन्ही नेते एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप करणार का याकडं पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचं लक्ष लागल आहे.

IMP