फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं

फडणवीस-चंद्रकांत पाटलांची वरिष्ठांसोबत बैठक; पक्ष कार्यालयात पुन्हा खलबतं

Devendra Fadnavis And Chandrakanat Patil

मुंबई : राज्यात महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. या अनुषंगाने आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)दिल्लीत दाखल झाले आहेत.

भाजप मुख्यालयात गेल्या तासाभरापासून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वरिष्ठांची बैठक सुरु आहे. काल चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पक्ष कार्यालयामध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे.

या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्याने संघटनात्मक बांधणी?, अशीही चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) देखील दिल्लीत दाखल झाले असून काल त्यांनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आज लगेच देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आज फडणवीस कोणाची भेट घेणार, याकडे आता लक्ष असणार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती अमित शहा यांना दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यांनी सांगितले. राज्यातील सद्यस्थितीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या