अमृता फडणवीस यांचा आवाज आणि मुख्यमंत्री, मुनगंटीवारांचा भन्नाट अभिनय

'मुंबई रिव्हर अँथम'; संगीत-चित्रफितीत मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक अभिनय!

टीम महाराष्ट्र देशा- नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धनाचं आवाहन करण्यासाठी ‘मुंबई रिव्हर अँथम’ ही संगीत-चित्रफित तयार करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं आहे. ही संगीत चित्रफित काल प्रदर्शित करण्यात आली. विशेष म्हणजे यात अमृता यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनीही अभिनय केला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा देखील अभिनय या गाण्यात पहायला मिळणार आहे.

sudhir munghtiwar

यु-ट्यूबवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या अँथममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता आणि अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी अभिनय केला आहे. मुंबईत पूर्वीच्या काळी असणाऱ्या नद्या आणि सध्या त्यांचे होत असलेले प्रदूषण यावर ‘रिव्हर अँथमच्या’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. या रिव्हर अँथममधील ‘स्टारकास्ट’ सध्या भलताच चर्चेचा विषय ठरत आहे.

असं असलं तरीही ‘मुंबई रिव्हर अँथम’ ही संगीत-चित्रफित हिंदीत का तयार करण्यात आली आहे याचं कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. नुकताच राज्यपालांच्या भाषणाचा गुजराती अनुवाद करण्यात आल्याने विरोधकांनी मोठा गदारोळ घातला होता. प्रकरण वाढू लागल्यावर मुख्यमंत्र्यांना माफी देखील मागावी लागली होती.


पाहुयात या चित्रफितीची एक झलक!

You might also like
Comments
Loading...