fbpx

गेल्यावेळी ४२ जागा जिंकल्या, तो आपला रेकॉर्ड नव्हता: मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप- सेना युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या. आताही सेना-भाजपा एकत्र निवडणूक लढवणार आहेत. २०१४ लोकसभेत जिंकलेल्या ४२ जागा या रेकॉर्ड नव्हता. खरा रेकॉर्ड २०१९ च्या लोकसभेत होणार असल्याचं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे.

२०१९ ची लोकसभा निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने लढणार असून संपूर्ण महाराष्ट्राला भगवे केल्याशिवाय राहणार नाही असं या ट्वीट मध्ये म्हणण्यात आल आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची चिंता वाढणार यात शंका नाही. मागच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी घेतील हे मात्र नक्की.