पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री

मुंबई- नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव,  सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करताना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला.

कथित माओवादी कनेक्शनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज कवी वरवरा राव, सुधा भारद्वाज,  अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांची नजरकैद 4 आठवड्यांनी वाढवली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस