आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर आघाडी सरकारने आमदारांची -मुख्यमंत्री

आघाडी सरकारनं दिलेल्या शेतकरी कर्जमाफीत आमदाराच्या घरातील चार जण लाभार्थी असल्याचा मुख्यमंत्रयांचा आरोप

नागपुर: आघाडी सरकारनं दिलेल्या शेतकरी कर्जमाफीत आमदाराच्या घरातील चार जण लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शेतकरी कर्जमाफीवर माहिती देताना त्यांनी विधानसभेत हा आरोप केला आहे.

सध्या नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशन सध्या चालू आहे. भाजपाने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी  विधानसभेत रान उठवले आहे. शेतकरी कर्जमाफी खरच झाली आहे का..? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारने आमदारांची कर्जमाफी केली असा आरोप केलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी 37 लाखांची कर्जमाफी मिळवल्याचंही त्यांनी नावांसह सांगितलं. भाजप सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना बंद झाली नसून आताही जो शेतकरी अर्ज करील त्या शेतकऱ्याला कर्जमाफी देणार असल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तयमुळे शेतकरी कर्जमाफी वरुन वातावरण अजुन तापण्याची शक्यता आहे.