दुष्काळाच्या छायेतील बार्शीकरांना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला

टीम महाराष्ट्र देशा-  बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत 250 महसूल मंडलांचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यासह बार्शीकरांना दिलेला शब्द पाळला आहे.

राज्य सरकारने 180 तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर, 31 ऑक्टोबर रोजी राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. मात्र, या दोन्ही यादीतून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीला वगळण्यात आले होते. त्यामुळे बार्शीकर नाराज झाले होते, तसेच दुष्काळ यादीत बार्शीचा समावेश व्हावा यासाठी बार्शीकरांकडून आंदोलन अन् निवेदनही देण्यात येत होते.

बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणखी 250 महसूल मंडलाचा दुष्काळ यादीत समावेश केला आहे. ज्या मंडलात 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला, त्याचा दुष्काळ यादीत समावेश करण्यात आला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून वगळण्यात आलेल्या बार्शी आणि उत्तर सोलापूरला स्थान मिळाले आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यातील 10 पैकी 9 मंडलांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मावळ आंदोलनातील २६० शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय

गुजरात दंगलीत मोदींने मौन बाळगल्याचे लिहिल्याने लेखकांवर गुन्हा दाखल

मी भारतीय असून माझा जन्म भारतातच : त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लल कुमार देव

1 Comment

Click here to post a comment