मुंबई कि तुंबई? मुंबईत नालेसफाई नाही तर हातसफाई होते: देवेंद्र फडणवीस

मुंबई: ‘नेहमीची येतो पावसाळा’ या मराठी म्हणी प्रमाणेच, आता ‘नेहमीची येतो पावसाळा अन वर्षानुवर्षे मुंबापूरीची होते तीच ती दैना’ असे झाले आहे. सलग चार दिवस राज्यात दमदार पडणाऱ्या पावसाने मुंबईत देखील तुफानी हजेरी लावली असून विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर, यामुळे मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्याचे दिसून आले.

यावरून आता, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कामावर चांगलेच ताशेरे ओढले असून १०० टक्क्यांहून अधिक काम झाल्याचे दावा करणाऱ्या पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी, ‘दरवर्षी मुंबईमध्ये पाऊस पडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते ती सुधारलेली कुठेही दिसत नाही. ज्याप्रकारे मुंबईमध्ये पाणी जमा झाले आणि एनडीआरएफला लोकांना बाहेर काढावे लागले. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. बीएमसी कायमच नालेसफाई झाल्याचा दावा करते. पण ती पूर्ण झालेली नाहीत. मी म्हणेन की 113 टक्के नालेसफाई ही फक्त सफाई आहे. ती कुठली सफाई हे तुमच्या लक्षात येते, ‘ असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

चीनशी सामनाचं काय, तर नाव घेण्याचे देखील मोदींमध्ये धाडस नाही; राहुल गांधींचे मोदींच्या हिम्मतीलाच आव्हान

पेडर रोडवर झालेल्या भूस्खलनाच्या घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी पाहणी केली असून ट्विट द्वारे त्यांनी, ‘मुंबईतील पेडर रोड येथे भूस्खलनामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. केवळ वाहतूक नाही तर पाणीपुरवठा सुद्धा खोळंबला आहे. या घटनास्थळाला आज भेट दिली. माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी, राहुल नार्वेकर आणि अन्य यावेळी उपस्थित होते.’ तसेच, त्यांनी ‘ मुंबईत दरवेळी अशा घटना घडतात, तेव्हा मुंबईतील अशा ठिकाणांची यादी तयार केली जात असल्याचे मुंबई महापालिकेतर्फे सांगितले जाते. मात्र, त्यावर काय कारवाई झाली, हे कळायला मार्ग नाही. ब्रिमस्टोवॅड, पम्पिंग स्टेशन यासारखे प्रकल्प गतीने पूर्ण केले, तरच मुंबईकरांचे प्रश्न लवकर सुटू शकतात,’ असा सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, ‘मुंबईत पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन या सखल भागात पाणी साचते. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कधीही पाणी न साचणाऱ्या नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह, चर्नी रोड यासारख्या दक्षिण मुंबईतील परिसरातही पाणी साचले. आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयाच्या या परिसरात पाणी तुंबल्याचं पाहत आहे,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

पत्नी खासदार नवनीत कौर राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांना देखील कोरोना संसर्ग