Devendra Fadanvis | “मागील सरकार ‘वर्क फॉर्म जेल’ चालायचे”; देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका

Devendra Fadanvis | अमरावती : राज्यात सध्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची सरकारपक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीत भाजपकडून सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात वसुलीचे उच्चांक गाठले गेले. ज्यावेळी ‘वर्क फ्रॉम होम’ ची सुविधा होती, त्यावेळी सरकारमधील काही मंत्री ‘वर्क फ्रॉम जेल’ असे कार्यरत होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.

The previous government run work form jail – Devendra Fadanvis

ते म्हणाले, “आज आपण पाहतो महाराष्ट्रात आपले सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या नेत्तृत्वात भाजप आणि इतर मित्र पक्षांचे सरकार आले. सहा महिन्यामंध्ये सरकार काय असत हे लोकांना कळायला लागले आहे. अडीच वर्ष सरकार बंदिस्त होते. ते दाराआड होत. फेसबुकवर लाईव्ह होत आणि लोकांमध्ये डेड होत. जनतेमध्ये हे सरकार दिसायचे नाही. मागच्या या सरकारचे दिसायचे काय ते फक्त वसुली दिसायची. वसुलीचे वेगवेगळे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले.”

गेल्या अडीच वर्षांच्या काळात या भागाला एक रुपया देखील मिळाला नाही, जो निधी सिंचन प्रकल्पांसाठी मिळाला, तोही केंद्र सरकारने दिला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांची मुदत २०२० मध्ये संपली होती, पण महाविकास आघाडी सरकारने, विकास मंडळांची हत्या केली. आम्ही या वैधानिक विकास मंडळांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. आम्ही विदर्भाला न्याय मिळवून देऊ, असं देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.