शिवसेनेचे भाजपप्रेम योग्यवेळी व्यक्त होईल : मुख्यमंत्री

नागपूर – आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.ते शनिवारी नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

Rohan Deshmukh

युतीसाठी मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे हा प्रस्ताव युतीच्या काळात आला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होईल असे काही नाही, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...