fbpx

विठ्ठलाची किमया न्यारी… मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सोलापुरातील कोल्ड्वार फेम नेते एकाच स्टेजवरी

टीम महाराष्ट्र देशा – रंजल्या गांजल्यांचा लाडका विठूराया म्हणून पंढरीच्या पांडुरंगाला बोलले जाते. देशभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असल्याने पंढरपूरमध्ये दररोज हजारो भक्तांची रीघ लागलेली असते. भक्तांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ‘कोल्ड्वार फेम’ नेते एकाच स्टेजवर आल्याने हा कार्यक्रम चर्चेचा विषय बनला आहे.

भक्तनिवास लोकापर्ण सोहळ्यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, राष्ट्रवादी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, पंढरपुरचे आमदार भारत भालके, आ प्रशांत परिचारक, माजी मंत्री सुधाकरपंत परिचारक, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले. माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी नेते उपस्थित होते.

सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यामध्ये असणारा सुप्त संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेला आहे. एकाच पक्षातील असणारे दोन्ही देशमुख एकमेकाला खिंडीत पकडण्यासाठी कायम आघाडीवर असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत दोन देशमुखांच्या मध्ये मनोमिलनासाठी अनेक प्रयत्न केले आहे. तर माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी जायंट किलर ठरलेले आ. भारत भालके यांच्यामध्ये कधी खुला, तर कधी सुप्त संघर्ष पहायला मिळाला आहे. तसेच परिचारक काका – पुतणे आणि विजय दादा यांच्यामध्ये देखील सर्व काही आलबेल आहे. त्यामुळेच पंढरपूरमध्ये झालेला कार्यक्रम शासकीय असला तरी कोल्ड्वार फेम नेते एकाच स्टेजवर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.