मुंबई : राज्यातील १२ भाजप आमदारांच्या निलंबनाबाबत हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या सर्व १२ आमदारांचे निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. एकीकडे भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून दुसरीकडे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडी सरकारसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली असून लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात. आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले, असे फडणवीस म्हणाले आहेत.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार. या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सातत्याने संविधानाची पायमल्ली करीत तानाशाही पध्दतीने सरकार चालविण्याचा प्रकार मविआ सरकारकडून होत होता, त्याला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली ही जोरदार चपराक’, असे फडणवीस म्हणाले आहेत.
।। सत्यमेव जयते।।
राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार!
या निकालाचे आम्ही स्वागत करतो.#12MLAs #Maharashtra #BJP— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 28, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘लोकशाहीविरोधी, बेकायदा, अवैध, असमर्थनीय प्रकार लोकशाहीत कधीच खपवून घेतले जात नसतात. आज न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपच्या १२ आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो.आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ १२ आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता तर त्या मतदारसंघातील ५० लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले.’
महत्वाच्या बातम्या:
-
“बहुमताच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम…”, ‘त्या’ निर्णयावरून दरेकरांचे टीकास्त्र
-
भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर संजय राऊत म्हणाले…
-
“तीन चाकी सरकारनं कायद्यात राहून राज्य करावं”, आ. कीर्तीकुमार भांगडिया
-
“…हा सत्याचा विजय”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर जे.पी.नड्डा यांची प्रतिक्रिया
-
वाईन विक्रीला वाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल- विनायक राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<