मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शिवसैनिक मोठ्या संख्येने मातोश्रीबाहेर जमले होते. त्यात एका ८० वर्षीय आजींचाही समावेश होता. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे बघयला मिळाले. तद्पश्चात काल (२४ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब या आजींची भेट घेण्यासाठी शिवडीमधील त्यांच्या घरी पोहोचले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात आज (२५ एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘वृध्द मातेला मुख्यमंत्री भेटले, हे चांगलेच झाले. पण त्या वृद्ध मातेने जो आक्रोश केला, तो मुख्यमंत्री समजून घेणार आहेत का? त्यांनी जी व्यथा व्यक्त केली, ती समजून घेणार का?’, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी एस टी कामगाराच्या कुटुंबीयांची सुद्धा भेट घ्यावी, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘सध्या मुंबईत जे घडत आहे, ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यावर सुरू आहे.’ तसेच मुंबईत मुख्यमंत्री तर राज्यातील इतर भागात राष्ट्रवादी गृह खाते चालविते आहे, असा घणाघातही यावेळी फडणवीसांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
- भोंग्याचा वाद! सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरेंनंतर फडणवीसांनी फिरवली पाठ
- “मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
- ‘लिव इन रिलेशनशिप मध्ये बलात्कार नसतो’, गणेश नाईकांना करणी सेनेचा पाठींबा
- …तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय?- देवेंद्र फडणवीस
- “प्रत्येकाने धार्मिक भावना आपल्या मनात ठेवाव्यात”- शरद पवार