Share

Devendra Fadanvis | “उद्धवजींकडे एकच अस्त्र, टोमणे अस्त्र”; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपांवर फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफचं चालवली. त्यामुळे विरोधक जोरदार टीका करत आहेत. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही विरोधकांच्या टीका-टिप्पणीला प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून वारंवार शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पलटवार केला आहे.

फडणवीस म्हणाले, “मी मागेही सांगितलं उद्धवजींकडे एक अस्त्र आहे, टोमणे अस्त्र असं त्याचं नाव आहे.” मला एकाच गोष्टींचा आनंद आहे की त्यांना उद्योगांचे महत्त्व कळाले, कारण राज्यातील उद्योग त्यांच्यामुळेच बाहेर गेल्याचा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला आहे.

यावेळी बोलताना गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये सभांना गेलो होतो,  तेव्हाच सर्व चित्र स्पष्ट दिसत होतं. फक्त मोदीच विकास करू शकतात असा विश्वास लोकांमध्ये होता. मोदींचं नाव घेताच लोकांमध्ये उत्साह दिसून यायचा. भाजप राज्यात गेली 27 वर्ष सत्तेत आहे, पुन्हा एकदा तेथील जनतेने भाजपवरच विश्वास दाखवला. सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे मी अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२७ वर्षांच्या सत्तेनंतर भाजपा पुन्हा निवडणुकीला सामोरे गेली. विरोधी पक्षांना वाटलं २७ वर्षे सत्तेत राहिल्याने सरकारविरोधी जनमत असेल. मात्र, या निवडणुकीत सरकारच्या बाजूने जनमत असल्याचं मी म्हटलं होतं. ते निकालातून दिसलं.” “लोकांनी मोदींवर आणि भाजपावर पूर्ण विश्वास टाकला आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झालाय. गुजरातमध्ये काँग्रेसला केवळ १६ ते १७ जागा मिळताना दिसत आहे. हा त्यांचा आतापर्यंतचा निचांक आहे,” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला चिमटा काढलाय.

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadanvis | मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफचं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics