दुकानदारी बंद पडल्यानेच राज ठाकरे फ्रस्ट्रेशन काढताहेत !

टीम महाराष्ट्र देशा : सध्या देशभरात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. राज ठाकरेंच्या सुरु असलेल्या सभांमध्ये त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देत , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोणती कमी ठेवली नाही.

अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय ते. दुकानदारी बंद पडल्यानेच ते फ्रस्ट्रेशन काढत आहेत, अशा शब्दात मुख्यमत्र्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. पुढे ते म्हणाले लोकांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा? तुमच कर्तृत्व काय? लोकांनी तुम्हाला का नाकारलं याचा विचार करा. केवळ चांगलं भाषण करता येतं म्हणजे झालं असं नाही. घरात बसून तेंडुलकरने फुलटॉस असाच खेळायला पाहिजे होते, तसाच खेळायला पाहिजे होता, हे सांगण सोपं असतयं. पण, प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळायला हवं. राज ठाकरे हे रिटार्यट असून ते आता कॉमेंट्रीमनची भूमिका बजावत आहेत, माहिती नाही यांना मानधन मिळतंय की नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एवढेच नाही तर, राज ठाकरेंची दुकानदारी बंद पडल्याने ते फ्रस्टेशन काढत आहेत. राज ठाकरेंची अवस्था ही क्रिकेटमधील रिटायर्ड कॉमेंट्रीमन सारखी आहे. त्यामुळेच भाजपा आणि मोदींना ते लक्ष्य करत आहेत, असेही फडणवीस म्हटले.