Share

Devendra Fadanvis | “अजितदादा, आम्ही काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो”; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadanvis | नागपूर : आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधीपक्षाने सत्ताधारी पक्षाला विविध मुद्द्यांवरून चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला मिळत आहे. आजदेखील विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सराकारने उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील विकासकामांना स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी खोचक टोला लगावला आहे.

ते म्हणाले, “तुम्ही सात सात वेळा निवडून आला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा आमची सगळी विकासकामं रोखण्याचं काम तुम्ही केलं होतं.”

पुढे ते म्हणाले, “तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला असला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आवश्यक त्या स्थगित्या उठवल्या आहेत. जिथे तरतुदी जास्त आहेत, तिथल्या स्थगित्या कायम ठेवल्या आहेत. लवकरच त्यासंदर्भातही योग्य निर्णय आम्ही घेऊ. आवश्यक असेल, तिथे सत्तारुढ पक्ष आहे की विरोधी पक्ष आहे असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही.”

पुढे बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात रखडवलेल्या विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “माझ्या स्वत:च्या मतदारसंघातली कामं तुम्ही रोखली होती. अडीच वर्षं भाजपाच्या लोकांना एक नवा पैसा तुम्ही दिला नाही. पण आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही. ज्या काही स्थगित्या आणल्या होत्या, त्यातल्या ७० टक्के स्थगित्या आम्ही उठवल्या आहेत.”

“३० टक्के स्थगित्या यासाठी कायम ठेवल्या आहेत, की शेवटच्या काळात वाटप करताना तरतुदीचा कुठलाही नियम पाळण्यात आलेला नाही. जिथे २ हजार कोटींची तरतूद आहे. तिथे ६ – ६ हजार कोटी रुपये वाटले आहेत. त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. हे पैसे आणायचे कुठून?”, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadanvis | नागपूर : आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विरोधीपक्षाने सत्ताधारी पक्षाला विविध मुद्द्यांवरून चांगलंच धारेवर धरलेलं पाहायला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Nagpur Politics Video