मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते, मुख्यमंत्र्यांची शिवसेनेवर टीका

टीम महाराष्ट्र देशा- पालघमध्ये श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्याबाबत इतर पक्षांसोबत बोलत असताना मित्र म्हणविणारे पाठीमागून कटकारस्थान करत होते. मनांत काळबेरे असणाऱ्यांना वनगा विषयी प्रेम नाही, या निवडणूकीत श्रीनिवास वनगा यांचा पराभव झाल्यावर मातोश्रीवरील दरवाजे बंद होईल पण भाजपा दरवाजे खुले असतील,अशी टीका शिवसेनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पालघर – लोकसभा पोट निवडणूक प्रचारासाठी पालघर जिल्हयात कासा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सभा होती, या सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.