fbpx

बुडत्या नावेत कोण बसणार ? राणेंच्या प्रवेशावरून मुख्यमंत्र्यांचा कॉंग्रेसला टोला

narayan rane and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा :  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांनी दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच राज्यासह देशातही कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. महाराष्ट्रातही कॉंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अशातच आज नारायण राणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक नेत्यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या कॉंग्रेस प्रवेशावर ‘बुडत्या नावेत कोण जाईल, अशी मार्मिक टिपणी करत कॉंग्रेसला टोला लगावला आहे.

या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे राणे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून कॉंग्रेसची होणारी वाताहात थांबवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे.