नया है वह, मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना?

aaditya and devendra

मुंबई :- राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्षामधील नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस आणि प्रवीन दरेकर यांना लगावला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये.”

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अश्या प्रकारचे आहे. कारण सरकार म्हणून जी जबाबदारी जनतेमध्ये जाऊन व सुख-दु:ख समजून त्याचे नियोजन करणे व आढावा घेणे व त्यावर उपाययोजना करणे असते ते करण्याएवजी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सरकारचा कारभार सुरु आहे. अश्या वेळी विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी जाऊन जर रुग्णांची दुख समजून घेत असतील व तेथील रुग्णालायांची व्यवस्था पाहत असतील तसेच तेथील व्यवस्था करण्यासाठी मदत होत असेल तर त्यावर अशा प्रकारे टिका-टिप्पणी करणे, म्हणजे महाराष्ट्रातील जनता ज्यापध्दतीने देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कोविडच्या परिस्थितीची आढावा घेत आहे, त्याचे कौतुक करित असताना त्यावर पोटशूळ उठले आहे. त्या उद्विगनेतून अशा प्रकारची भूमिका पर्यटनमंत्र्यांना स्पष्ट करावीशी वाटत आहे. असे सडेतोड प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

जिल्हयात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांची तात्काळ माहीती द्या – डीवायएसपी टिपरसे

‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’