…अन्यथा मी सरकारला धारेवर धरणार, जाब विचारणार : फडणवीस

devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचे नाते देखील फडणवीस यांनी बोलून दाखवले. ते एका वृत्तवाहिनी मुलाखत देताना बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले. भाजप – शिवसेनेचे सहकार येऊ शकलेले नाही. जनतेने आम्हाला कौल दिला होता. हा जनमताचा अपमान आहे. आता नवीन सरकार आले आहे. त्यांच्याकडून विकासकामांची अपेक्षा आहे, असे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे. मात्र, त्यानंतर जनतेच्या विरोधातील निर्णय घेतले तर मी या सरकारला सोडणार नाही. त्यांना धारेवर धरणार, असा इशारा यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

दरम्यान, हे तीन पक्षांचे सरकार आहे. ते किती दिवस चालेल ते माहीत नाही. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि माझी मैत्री कायम आहे. या मैत्रीत दुरावा निर्माण झालेला नाही, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. तसेच उद्धवजी यांनी कोठेही तोडण्याची भाषा केलेली नाही. किंवा मीही काही भाष्य केलेले नाही. आमच्या दोघांच्यामध्ये कोणतीही भींत नाही. त्यामुळे ही मैत्री पुढे कायम राहिल, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :