fbpx

जनतेने नाकारलेल्या राज ठाकरेंवर सूड उगवून आम्हाला काय फायदा : फडणवीस

raj thakare vr devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल ९ तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी झाली. त्यानंतर रात्री ८ वाजता राज ठाकरे इडीच्या कार्यालयातून बाहेर पडले.

राज ठाकरेंच्या या चौकशीला भाजपला जबाबदार धरले जात आहे. सरकारकडून ठाकरेंवर सूड उगवला जातोय अशी टीका होत असताना मुख्यमंत्र्यांनी यावर भाष्य केले आहे. फडणवीस यांनी २०१४ च्या लोकसभेत काहीच नाही, मग विधानसभेत त्यांची एक जागा आली, तोही आमदार शिवसेनेत गेला. महापालिकेत नाशिक त्यांच्याकडे होती, तिथेही दोघेच जण निवडून आले. इतर कुठल्याही महापालिकेत त्यांची लोकं निवडून आली नाहीत.

तसेच ‘या लोकसभेत इतकी टोकाची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. स्टार प्रचारक बनले. वाटेल तसं बोलले. कुठल्याही स्तरावर जाऊन बोलले. तरी देखील त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने नाकारलं आहे. ज्यांच्या नेतृत्वाला कोणीही समर्थन द्यायला तयार नाही. त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करुन आम्हाला कोणता लाभ आहे. मी प्रॅक्टिकल विषय सांगतो. म्हणजे आम्ही लाभ असला, तरी करणार नाही. पण सांगा आम्हाला काय लाभ आहे? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘राज ठाकरेंजवळ योग्य कागदपत्रं असतील, तर ते देतील. आणि त्यांचं म्हणणं ईडी ऐकतील. नसतील तर ईडी कारवाई करेल. त्याच्यात भाजपला, आम्हाला गोवण्याचं काही कारण नाही’ असंही विधान केले आहे.