मतदान सक्तीचे करण्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने विचार करावा – मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा: मतदान सक्तीचे करण्याविषयी राज्य निवडणूक आयोगाने विचार करावा असं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत आयोजित राज्य निवडणूक आयोगाच्या लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यापूर्वी देखील भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी मतदान सक्तीचे करावे अशी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मतदान सक्तीचे करावे का हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

देशात जवळपास अर्धे मतदार मतदान करत नाहीत. मतदानाविषयीचा निरुत्साह, सरकारवरील नाराजी यासारख्या विविध कारणांमुळे मतदानाची टक्केवारी घसरते. त्यामुळे 50 टक्के मतदानापैकी काही टक्के मतदान मिळवलेला उमेदवार किंवा पक्ष जिंकून येतो आणि सत्ता मिळवतो. 2014 मध्ये भाजपच्या बाजुने लाट होती. त्यावेळी भाजपने मोठा विजय मिळवला होता. मात्र भाजपला मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी फक्त 30 टक्के होती. विरोधी पक्ष आता मुख्यमंत्र्यांच्या या मागणीला कसा प्रतिसाद देतात ते पहावं लागेल.Loading…
Loading...