आज आंतरराष्ट्रीय योग दिवस; मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी केली योगसाधना

टीम महाराष्ट्र देशा : आज भारतासह जगभरात योग दिवस साजरा केला जात आहे. डिसेंबर २०१४ साली संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात २१ जून २०१५ पासून झाली. आज संपूर्ण जगात ५ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे.

या प्राचीन भारतीय पद्धतीला जगमान्यता, राज मान्यता मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने मोठा पुढाकार घेतला होता. २७ सप्टेंबर २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली होती. १९३ पैकी १७५ देशांनी हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारला होता. २०१४ साली ११ डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे योगा केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग गुरु रामदेव बाबा यांच्यासोबत नांदेडमध्ये योगासने केली. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नागपूरमध्ये योग केला.Loading…
Loading...