विखे-पाटलांना आधी वॉर्निंग देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पाठवली थेट नोटीस

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत राज्य सरकारने केलेल्या बदलांमुळे निवडक बिल्डरांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा लाभ झाला आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्री कार्यालयाने 10 हजार कोटींची डील केली असून त्यातील 5 हजार कोटींचा पहिला हप्ता पोच देखील झाला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.आता विखे-पाटील यांना हा आरोप चांगलाच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील यांना थेट नोटीस पाठविली आहे.

मुंबईच्या विकास आराखडय़ामध्ये विकासकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आल्याचं विखे-पाटलांनी म्हटलं होतं तसेच यासाठी मुख्यमंत्री कार्यालय आणि विकासकांमध्ये 10 हजार कोटींचा सौदा झाला असा खळबळजनक आरोप देखील त्यांनी केला होता. या गंभीर आरोपांनंतर मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झाले होते. विखे-पाटलांनी केलेले आरोप एकतर सिद्ध करावेत, अथवा बिनशर्त माफी मागावी. असे न केल्यास त्यांच्याविरूद्ध मानहानीचा दावा दाखल केला जाईल अशी वॉर्निंग मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

यानंतर नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  राधाकृष्ण विखे-पाटील यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे. ‘माफी मागा अन्यथा मानहानीचा दावा दाखल केला जाईल’ असा इशारा या नोटिसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

2 Comments

Click here to post a comment