प्रवेश करायचा पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते; इतर पक्षातील नेत्यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडे आग्रह

cm devendra fadanvis

औरंगाबाद: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप शिवसेनेमध्ये इतर पक्षातील नेते नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या इन्कमिंग वाढतच चालली आहे. औरंगाबादेत 27 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश ला येणार आहेत याच यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहेत. या सभेपूर्वी शहरातील काँग्रेस-राष्ट्रवादी व इतर पक्षातील नेते पदाधिकाऱ्याचा भाजपात प्रवेश होणार आहे. भाजप प्रवेशासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याची इच्छाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे.

यामुळे प्रवेश करणार पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत असा आग्रही काही भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी धरला आहे. या जाहीर सभेत दरम्यान इतर पक्षातील विद्यमान नगरसेवक तथा माजी नगरसेवक व इतर पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रवेशासाठी मुख्यमंत्री च्या स्टेजवर जाण्याची संधी प्रवेश करणाऱ्यांना मिळणार असल्यामुळे हा आग्रह धरण्यात येत असल्याचेही चर्चा शहरात रंगू लागले आहेत. प्रवेश करणार यांचा आग्रह भाजप पदाधिकारी पुरवणार की नाही आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या