औरंगाबाद: महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याचे शक्तिप्रदर्शन

औरंगाबाद: लोकसभेच्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पार्टीने आता विधानसभेकडे लक्ष केंद्रित केले आहेत. विधानसभेत बहुमताने निवडून येण्याच्या उद्देशाने भाजपतर्फे महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. राज्य सरकारने पाच वर्षात केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचत पुन्हा पाच वर्ष संधी मिळावी यासाठी भाजपतर्फे ही यात्रा काढण्यात येत आहे. 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा मराठवाड्यात येणार आहे या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे.

पुन्हा आणूया आपले सरकार या टॅगलाईन खाली शासनाने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचत आगामी विधानसभाची ही तयारी यातून केली जात आहे. कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे ही महा जनादेश यात्रा थांबवण्यात आली होती. 25 ऑगस्टला बीड येथून यात्रा सुरुवात होईल 28 ऑगस्टला ही यात्रा औरंगाबादेत येणार आहेत. यानिमित्त या महाजनादेश यात्रा व जाहीर सभेसाठी लाखो लोक कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी भाजप कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली आहे. यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक मतदारसंघात नियोजनाच्या बैठकांवर बैठका सुरू आहे.

औरंगाबादेत 21 ऑगस्टला शहर आणि जिल्ह्यात यातील विधानसभा मतदार संघ निहाय बैठका घेण्यात आल्या. ह्यात भूतनी हाय कार्यकर्त्यांना जाहीर सभेसाठी माणसे आणण्यासाठी टार्गेट देण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व पश्चिम मध्य या विधानसभा निहाय मतदार संघाच्या बैठका घेण्यात आल्या.

या बैठकांमध्ये राज्यमंत्री शहर व शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यांत तर्फे जास्तीत जास्त लोकांना सभेला आणा असे आवाहन करण्यात येत आहे. सत्ताधारी असलेल्या भाजपलाही सभेसाठी कार्यकर्त्यांना टार्गेट देत मुख्यमंत्र्यांच्या सभेला कार्यकर्त्यांना आणण्याची वेळभाजपच्या पदाधिकार्यावर आली आहेत.

महत्वाच्या बातम्या