fbpx

‘मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या एकीमुळे मिळाले आहे, मी फक्त माझे कर्तव्य केले’

टीम महाराष्ट्र देशा : भाजप सरकारला मिळालेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अनेक कामे मार्गी लागली आहेत. परंतु राज्यातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी पडला. पुढील पाच वर्षांचा कालावधीही भाजप सरकारला मिळाल्यास सर्व कामे करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात दिली.

यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी, असे सांगत विठ्ठलाला काय साकडे घातले याचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण त्यांच्या एकीमुळे मिळाले आहे. मी फक्त माझे कर्तव्य केले. विठुरायाची कृपा असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळाले. यामुळे यंदाच्या वर्षी मला आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या महापूजेला येणे सोयीस्कर झाले. मराठा समाजाकडून याच पंढरीत माझा सत्कार करण्यात आला. मराठा व धनगर समाजाचे राहिलेले प्रश्नही सोडविणार आहे. अस देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.