देवेन शहा खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या तावडीत

पुणे – बांधकाम व्यावसायिक देवेन शहा खून प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी राहुल शिवतारे याला पकडून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला हल्लेखोर रवींद्र चोरगे याला डेक्कन पोलिसांनी जळगाव येथून अटक केली होती. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुलचा शोध सुरू केला होता.

शिवतारे याला पोलिसांनी राजाराम पुलाजवळून रात्री पकडले. तसेच या हल्ल्यात वापरण्यात आलेल्या पिस्टल सकट आणखी एकाला पोलिसांनी ठाणे येथून अटक केली. सुरेंद्र पाल असे त्याचे नाव आहे. खुनासाठी वापरण्यात आलेल्या पिस्टल पाल याच्याकडे ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून पिस्टल हस्तगत केले आहे.

दरम्यान, खून नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. चोरगे हा इस्टेट एजंट होता. तो शेतक-यांकडून जमिनी घेऊन त्या रिअल इस्टेट व्यावसायिकांना कमिशन घेऊन देत असत. त्यातूनच ही हत्या घडली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments
Loading...