विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे! शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विकासकामांच्या अंमलबजावणीवरुन भाजपला टोला लगावला आहे. काही झाले तरी विकासाचे भूत जिवंत ठेवायला हवे. पुन्हा भूत अदृश्य असते. त्यामुळे ज्याने त्याने या विकासाच्या भुताटकीचा शोध घ्यावा असाच एकंदर सरकारी अंमलबजावणीचा कारभार दिसतो, असे आजच्या सामनातून सरकारला टोले लगावले.

bagdure

नागपुरात अत्याधुनिक पोलीस भवन निर्माण करण्यासाठी मंत्रालयातून निधी आणण्याचे कठीण काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बाबनकुळे त्यांचे गडकरींनी अभिनंदन केले. आम्हीसुद्धा आनंद व्यक्त करीत आहोत. नितीन गडकरी हे दिलखुलास बोलतात. त्यामुळेच कदाचित गडकरी हे फाटक्या तोंडाचे आहेत असा आरोप त्यांच्याविषयी केला जातो, पण ते अनेकदा परखडपणे बोलतात व त्यांच्या परखड फटकेबाजीतून भाजपमधील आप्तस्वकीयसुद्धा सुटले नाहीत. असे देखील सामनातून स्पष्ट करण्यात आले.

You might also like
Comments
Loading...