fbpx

नातवांचे राजकारण: कर्नाटकातील देवेगौडा आजोबांनी रडतरडत दिली नातवाला उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये नातवाला संधी देण्यासाठी पवार आजोबांनी माघार घेतल्याचे पहायला मिळालं, तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी नातवाला राजकारणाच्या आखाड्यात उतरवत असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांना स्टेजवरच रडू कोसळले.

कर्नाटकच्या राजकारणात देवेगौडा कुटुंबाचा मोठा दबदबा असून त्यांचे पुत्र कुमारस्वामी हे सध्या मुख्यमंत्री आहेत. तर लोकसभा निवडणुकीसाठी नातवाला उमेदवारी देत देवेगौडा यांनी आपली तिसरी पिढी देखील राजकारणात उतरवली आहे. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णाला हासन लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

जनता दल सेक्युलरच्या बैठकीत देवेगौडा यांनी रेवण्णाला लोकसभा उमेदवारी देण्यात येत असल्याचे घोषित केले. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. उमेदवारीची घोषणा करताना आजोबांना रडताना पाहून नातवाचाही बांध फुटला.