प्रवाशांनो कृपया इकडे लक्ष द्या! दोन दिवस देवगिरी एक्स्प्रेस पूर्णतः, तर नंदिग्राम एक्स्प्रेस अंशतः रद्द

Devagiri Express completely canceled For Two Days, while Nandigram Express partially canceled

औरंगाबाद : ठाणे आणि मुलूंड रेल्वेस्थानकावर लाइन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने नांदेड ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस दोन दिवस पूर्णतः रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय नंदीग्राम एक्स्प्रेस दोन दिवस अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती दक्षिण मध्य रेल्वेने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

मध्य रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकानुसार, ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकावर महत्त्वाचे काम करण्याकरिता लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नांदेड विभागातून मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस दोन दिवस पूर्णतः, तर नंदीग्राम एक्स्प्रेस अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्स्प्रेस रेल्वे 23 व 24 जानेवारी उपलब्ध नसणार आहे. तर मुंबई ते सिकंदराबाद एक्प्रेस 24 व 25 जानेवारी रोजी रद्द असेल. याशिवाय आदिलाबाद ते मुंबई ही विशेष एक्स्प्रेस 23 व 24 जानेवारी रोजी कल्याण ते मुंबईदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आदिलाबाद ते कल्याणपर्यंत मात्र ही रेल्वे सुरू राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या