`देवा’ चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन; मात्र अत्यल्प ठिकाणी प्राईम टाईम

देवा

मुंबई : मराठी चित्रपटाला स्क्रीन न मिळाल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर `देवा’ चित्रपटाला राज्यभरात २२५ स्क्रीन देण्याचा निर्णय चित्रपटगृह मालकांनी घेतला आहे.  राज्यभरातील २२५ स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. असे असले तरी फारच कमी ठिकाणी चित्रपटाला प्राईम टाईम मिळाला आहे. त्यामुळे आता मनसे याबाबत नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.