आम्ही वारंवार केलेल्या टीकेमुळे मुख्यमंत्री आता बाहेर पडत आहेत

कोल्हापूर : आम्ही वारंवार टीका केल्याने मुख्यमंत्री आता बाहेर पडत आहेत. याबद्दल त्याचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोला भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

पाटील पुढे म्हणाले की’ आपत्ती परिस्थितीत फिल्डवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात,कोरोनात सर्व मदत केंद्राने केली. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व मदत केंद्र सरकारने केली आहे. गोरगरिबांना धान्यापासून, सिलेंडर, पैसे सर्व काही मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतही केंद्र सरकारने केली आहे,त्यामुळे सगळे केंद्रानेच करायचे तर तुम्ही काय करणार असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अतिवृष्टीबाबत मदत मागण्यासाठी जाण्याचे नियोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जरूर जातील,असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्या उद्धव ठाकरे यांचा उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-