Share

Uddhav Thackeray | बिनडोक माणसं राज्यपाल पदावर नको, उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्र बंदचे संकेत

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यातील सत्ताधारी भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढत्या दबावामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. उदयनराजे भोसले यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील महाराष्ट्र बंदचे संकेत दिले होते. आज पुन्हा उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “राज्यपाल हे केवळ राज्यपाल नाही तर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. राज्यापालांच्या नियुक्तीचे निकष ठरवले गेले पाहीजे. केवळ माझ्या मर्जीतला आहे म्हणून कोणताही बिनडोक माणूस या पदावर बसवणे, असे चालणार नाही.”

भाजपमधील शिवरायप्रेमीही राज्यपालांविरोधात बोलत आहेत-

“मी गेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. जे शिवप्रेमी आहेत. या विरुद्ध आवाज उठवायला पाहीजे. तो कार्यक्रम आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. उदयनराजेंना मी धन्यवाद देईल कारण मी म्हटले आज जी काही भूमिका मांडली त्याबाबत मी त्यांना धन्यवाद देईल. भाजपमधील शिवरायप्रेमीही आता राज्यपालांविरोधात बोलत आहेत, ही चांगली गोष्ट आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र बंदचे संकेत-

उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही राज्य सरकारला अवधी दिला होता. कारण घाई-घाईने काही व्हायला नको. मात्र राज्यपालांना पाठींबाच मिळत असेल. तर आम्हाला लवकरच आमच्या मार्गाने निषेध करावा लागेल,  महाराष्ट्र बंद किंवा असाच काही कार्यक्रम करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे

मिंधे सरकार दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यात धन्य-

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर उद्धव ठाकरे म्हणाले, “कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबईत कर्नाटक भवन बांधत आहेत. बेळगावमध्ये येऊ नका, असे पत्र आपल्या मुख्यमंत्र्यांना पाठवता. मात्र, याविरोधात आपले मुख्यमंत्री ब्र सुद्धा उच्चारत नाहीत. अद्याप मुख्यमंत्री शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राला मिंधे सरकारची फळ भोगावी लागत आहेत. मिंधे सरकार हे दिल्लीश्वरांचे पाय चाटण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांच्याकडून अभिमान, स्वाभिमानाची अपेक्षा नाही. एकीकडे कर्नाटक महाराष्ट्रातील गावातील पाणी सोडून ते गाव घशात घालण्याचा डाव रचतोय. तर, दुसरीकडे, आपले मिंधे सरकार मात्र, सत्तेच्या पाण्यात गटांगळ्या खात आहे.”

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पाणी नाही, त्यामुळे कर्नाटक सरकारने तालुक्यातील दुष्काळी भागासाठी पाणी सोडले आहे. कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील गावांना पाणी देऊन महाराष्ट्र सरकारला आव्हान दिले आहे. या सर्व घटनांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जतमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलत दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढण्याची घोषणा केली आहे.

यादरम्यान जत तालुक्यातील काही लोक मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. तालुक्यातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात दोन हजार कोटी रुपयांची निविदा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या :

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकले आहे. महाविकास …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now