शिवसेनाप्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सविस्तर आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री

Detailed report submit for ShivSena Suprimo National Memorial - CM

मुंबई  : स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वांना प्रेरणा मिळेल असे उभारण्यासाठी नगरविकास विभागाने सविस्तर आराखडा तयार करुन शासनाला सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीस उपस्थित होते. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाची माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात येथे येणाऱ्या अनुयायांची संख्या, त्यांना पुरवावयाच्या सोयी-सुविधा, वाहनतळ आदींच्या अंतर्भावासह सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सविस्तर आराखडा प्राप्त झाल्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loading...