देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर नियतीचा घाला

bhavik dead at nevasa

राहुल कोळसे.(नेवासा) – नेवासा तालुक्यातील वरखेड येथे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा गोदावरी नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  देवीच्या दर्शनासाठी आलेले औरंगाबाद येथील भाविक दर्शनाआधी आंघोळ करण्यासाठी गेले असता शुक्रवारी दुपारी 1 वाजल्याच्या सुमारास दोन भक्तांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये  नानेश्वर विश्वनाथ आव्हाड वय वर्षे 45 .राहणार पोतुळ तालुका गंगापुर व लहू प्रभाकर भालेराव वय 30 राहणार वेरुळ असे मृत्यू झालेल्या भक्तांची  नावे आहेत.  शुक्रवारी दुपारी 3:30 वाजल्याच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास स्थानिक नागरिकांना यश आल .

नाना परसाळे रामडोह या व्यक्तीने मृतदेह बाहेर काढले. दरम्यान  संरपच राजेंद्र गोरे, पोलीस पाटील संतोष गोंगाशे, कडुबाळ गोरे, दादासाहेब गोरे, हे घटनास्थळी उपस्थित होते