जमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत

टीम महाराष्ट्र देशा : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असेलेले पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयने दाखल केलेल्या गु्न्ह्यात जामीन दिला आहे. मात्र ते सध्या ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांना जमीन मिळूनही पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीतच  राहावं लागणार आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेले पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली होती. अटकेपासून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पी. चिदंबरम यांना जमीन मंजूर करत अखेर न्यायालयात त्यांना दिलासा दिला आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने पी. चिदंबरम यांना तुरुंगातून बाहेर जाता येईल, पण त्यासाठी 1 लाख रुपयांच्या जामीन घ्यावा लागणार आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. इतर कोणत्याही प्रकरणात पी. चिदंबरम यांची गरज नसल्यास त्यांना जामीन मिळू शकतो. तसेच पी. चिदंबरम न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय ते देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. तपास यंत्रणा जेव्हा पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी बोलावतील तेव्हा त्यांना यावंच लागेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...

 

Loading...