मुलं असूनही आई फिरत होती रस्त्यावर, नांगरे पाटलांच्या दणक्याने मुलांची अक्कल आली जागेवर

नाशिक: जन्मदात्या मातेला पोटच्या मुलांकडून वाऱ्यावर सोडले जाण्याच्या घटना वाढत आहेत, आयुष्यभर मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या आईला उतार वयात मिळणाऱ्या अमानुष वागणुकीमुळे रस्त्यावर राहण्याची वेळ येते, अशाच एका आईला नाशिकचे आयुक्त दबंग आएएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा घरी परतता आलं आहे. या आईचं नाव आहे श्रीमती प्रमिला पवार.

श्रीमती प्रमिला नाना पवार पवार यांचे पती नाना श्रावण पवार यांचे १९९५ साली निधन झाले. त्यांना सतीश आणि आतिश अशी दोन मुले आहेत. सतीश हा वस्तू आणि सेवा कर विभागात नोकरी करतो तर आतिश हा परिवहन विभागात कंडक्टर म्हणून काम करतो, असं असूनही दोन्ही मुले माझा सांभाळ करत नाहीत, सुना त्रास देतात असं प्रमिला याचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या इकडे तिकडे भटकंती करत असतात.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वेड लागलं असल्याने आपल्याला घरातून बाहेर काढलं आहे असं सांगण्यात आले होते. हा व्हीडिओ नाशिक पोलिसांकडे आल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्या व्हीडिओप्रमाणे तपास करण्यास सुरूवात केली आणि चांगल्या पदावर असून देखील आईचा सांभाळ न करणाऱ्या मुलांचा शोध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लावला. त्यानंतर त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून घेण्यात आलं आणि आई व मुलांच्यात मनोमिलन घडून आणले. यापुढे सर्वजण एकत्र राहतील अशी ग्वाही मुलांनी पोलीस आयुक्तांना दिली.

या घटनेत गेली गेली तीन वर्ष रेल्वे स्टेशनवर भीक मागत असलेल्या आईला तिच्या मुलांचा शोध घेऊन तिच्या घरी पोहोचवण्याचं काम नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी केलं आहे. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमुळे त्या मातेचा शोध घेण्यास मदत झाली