पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात एकहाती सत्ता असुन देखील भाजप कमी पडत आहे : कॉंग्रेस

davendra phadnvis

पुणे – पुण्यातील ‘कोरोना परिस्थिती हाताळण्यात’ एकहाती सत्ता असुन देखील भाजप कमी पडत आहे. उपाययोजना करण्यास पुणे मनपा ‘आरोग्य प्रमुख’ असफल ठरत असून आरोग्य प्रमुखांची नेमकी भूमिका काय हे कळत नसून कारण त्यांची सर्व कामे व कर्तव्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हेच पार पाडत असल्याचा देखील आरोप राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केला.

प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र, पुणे शहराची माहीती असलेला व स्थानिक व सक्षम अधिकारी नियुक्त करा अशी पुणे मनपा आरोग्य प्रमुख नियुक्ती बाबत ‘राज्य सरकार’कडे मागणी केल्याचे देखील गोपाळ तिवारी यांनी सांगीतले.या प्रसंगी मनपा काॅंग्रेस पक्षाचे गट नेते आबा बागूल देखील उपस्थित होते.

भाजपला पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळता आली नाही , भरीव तरतूद करता आली नाही,उपाययोजना करण्यास आरोग्य प्रमुख असफल झाले. आरोग्य प्रमुखांची नियुक्ती देखील निकषांनुसार झालेली नाही, त्यामुळे आरोग्य विषयक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले पाहिजे, पालिकेचे डॉ.रामचंद्र हंकारे ‘आरोग्य प्रमुख’पदास न्याय देण्यास असमर्थ आहेत. आरोग्य प्रमुखांनी मार्च महिन्यात अंदाज पत्रकात आग्रही वाढीव तरतूद करायला हवी होती. खासगी रुग्णालयांशी करार करण्यासारख्या गोष्टींमध्ये देखील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना लक्ष घालावे लागत आहेत. पुणे मनपा ‘आरोग्य प्रमुखांनी’ मनपाच्या आरोग्य यंत्रणा व इन्फ्रास्ट्रक्चर वर अधिक लक्ष देवून त्या सक्षम करणे गरजेचे आहे पण एकंदर आढावा घेतां ते खासगी रुग्णलयांकडे कल असल्याचे प्रत्ययास येते,असे देखील गोपाळ तिवारी यांनी सांगितले.

पालिकेने कोरोना परिस्थितीत निवृत्त व माजी आरोग्य प्रमुख अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली नाही.“कोरोना विषयक हेल्पलाईन” प्रभावी ठरलेली नाही. हेल्प लाईन विविध हाॅस्पीटलचा अंतर्भाव असलेल्या डॅशबोर्डला जोडल्यानंतर जाहिरात करण्यात आली नाही. सरकारी, निमसरकारी रुग्णांलयांऐवजी खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. आरोग्य विषयक उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र व सक्षम कार्यकारी अधिकारी देखील नेमला जावा, अशी मागणी गोपाळ तिवारी यांनी केली.

नागरिकांचे समुपदेशन याकडे दुर्लक्ष होत आहे, याकडेही मनपा ने कोरोना विषयक भिती घालवणे बाबत सकारात्मक विचार व प्रबोधने यांच्या ॲाडीओ व व्हीडीओ कॅसेट्स व रूग्णांचे ‘मानसिक स्वास्थ्य’देखील वाढवणे बाबत समुपदेशन करणे देखील औषधां एवढेच गरजेचे आहे, या कडे ही त्यांनी लक्ष वेधले.

पुणेकरांच्या जीवाशी खेळू नका : आबा बागूल

मुंबईतील कोरोना संक्रमण आटोक्यात येत असताना पुण्यात साथ वाढत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात भाजप आणि पालिकेची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. महापौर वगळता भाजपचे कोणीही काम करताना दिसत नाही, असा आरोप काँग्रेस गट नेते आबा बागूल यांनी यावेळी केला.

कोरोना होऊ नये यासाठी वेगळी यंत्रणा पालिकेने केली पाहिजे. २४ तासांची अधिक प्रभावी “हेल्प लाईन” ऊभी करणे गरजेचे असल्याचे सांगितले.. कोरोना झाल्यावर करावयाच्या उपाययोजनांसाठी स्वतंत्र यंत्रणा पालिकेने उभी केली पाहिजे. भाजपने, प्रशासनाने सर्व पक्ष, संघटना, स्वयंसेवी संस्थांना एकत्र विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.कोरोनाची प्रतिबंधक लस येत नाही, तोपर्यंत पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे घरोघरी पोचवली पाहिजे, असेही बागूल यांनी सांगितले.

‘कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर मनपाचे ठराविक दवाखाने सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार

फडणवीसांच्या ‘अतिआत्मविश्वासी’ आणि ‘घमंडी’ वृत्तीमुळे महाविकास आघाडी अस्तित्वात

होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या घरास स्टीकर लावणे बंधनकारक