जामीन मिळूनही आजची रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागणार!

जामीन मिळूनही आजची रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागणार!

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने दोन ऑक्टोबर रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर छापा टाकत आर्यन खानसह आठ जणांना अटक केली होती. मुंबई हायकोर्टानं आर्यन खानला दिलासा दिला आहे. आर्यन खानसाठी मुकुल रोहतगी यांनी केलेल्या युक्तिवादानंतर मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.

आता संपूर्ण आदेशाची प्रत उद्या शुक्रवारी मिळेल. आर्यनची उद्या किंवा शनिवारपर्यंत कारागृहातून सुटका होईल, अशी माहिती आर्यनच्या वकिलांनी दिली. आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असं मुकूल रोहतगी यांनी सांगितलं. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, असं वकिलांनी सांगितलं. मात्र, जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. मात्र, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी काल पार पडली. आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला होता. तर काल अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र एनसीबीचा युतीवाद राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय.

महत्त्वाच्या बातम्या