पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ होऊनही भारतीय खेळाडूंच्या मागेच!

viart

नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटपटू सध्या आर्थिक समस्येशी  झगडत आहेत. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. ( PCB) नवी अध्यक्ष रमीझ राजा यांनी खेळाडूंच्या पगारात २५० टक्क्यांनी वाढ करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. पगारवाढीच्या या निर्णयावर पाकिस्तानी खेळाडूही खुश झाले आहेत.

रमीझ राजा यांच्यानिर्णयाचा सर्वात जास्त फायदा हा D गटातील खेळाडूंना होणार आहे. त्यांचा पगार आता ४० हजार पाकिस्तानी रुपये म्हणजे भारतीय रक्कमेत १७ हजार इतका होता आणि आता त्यांचा पगार १ लाखांच्या वर गेला आहे. आता त्यांना १ लाख ४० हजार पगार मिळणार आहे.

नवीन अध्यक्ष रमीज राजा यांनी खेळाडूंच्या पगारात एक लाखांनी वाढ केली आहे. प्रथम श्रेणी व ग्रेड स्पर्धेतील क्रिकेटपटूंना १.४० लाख ते २.५० लाख ग्रेड A मधील खेळाडूंचा पगार १३.७५ लाखांवरून १४.७५ लाख, ग्रेड B मधील खेळाडूंचा पगार ९.३७ लाखांवरून १०.३७ लाख आणि ग्रेड C मधील खेळाडूंचा पगार ६.८७ लाखांवरून ७.८७ लाख इतका झाला आहे.

तर दुसरीकडे पाहिलं तर भारतीय खेळाडूंचा पगार त्यांच्या पेक्षा खूप पटीने जास्त आहे. भारताच्या ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. ग्रेड ए मधील खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड बी खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड सी मधील खेळाडूंसाठी 1 कोटी रुपये वर्षाला पगार दिला जातो.

महत्वाच्या बातम्या