कर्नाटक निवडणुकीत हिंदुनी ठरवा, राम जिंकणार की अल्लाह! : भाजप आमदार

भाजप आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे रामनाथ राय आणि भाजपाचे राजेश नायक यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंतवाल मतदारसंघात बोलत असतांना भाजप पक्षाचे आमदार सुनिल कुमार यांनी ही निवडणूक म्हणजे राम विरुद्ध अल्लाह अशी लढाई आहे. असे खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

भाजप पक्षाचे आमदार सुनिल कुमार यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे शाब्दिक युद्ध भडकण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि कॉंग्रेस मध्ये शाब्दिक लढाई सुरु असून आता करकाला मतदारसंघातील आमदार सुनिल कुमार यांनी लढाई मध्ये उडी घेत. आगामी विधानसभा निवडणुका म्हणजे ‘राम विरुद्ध अल्लाहची लढाई’ आहे. त्यामुळे आता हिंदुनी ठरवायचे आहे की, येथे राम जिंकणार की अल्लाह , असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.