गडकरींना सोलापुरी हुरडा पार्टी देऊन लोकसभेसाठी देशमुखांची साखर पेरणी

सोलापूर : माढा लोकसभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुखांचे नाव चर्चेत आहे. त्या दृष्टीने सुभाष देशमुख हे सुद्धा लोकसभा मतदार संघात बैठका, गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. त्यातच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना घरी सोलापुरी हुरडा पार्टी देऊन लोकसभेसाठी देशमुख साखर पेरणी करत असल्याची चर्चा सध्या आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूर येथील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरी हुरडा पार्टी खाण्यासाठी आले होते. यावेळी या हुरडा पार्टीला भाजप जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांच्याश देशमुख यांचे खास साहारी उपस्थित होते. यामाध्यमातून देशमुख हे माढा लोकसभेची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. देशमुख हे नितीन गडकरी यांचे कट्टर समर्थ मानले जातात. त्यामुळे माढा लोकसभेची उमेदवारी त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा अध्या माढा लोकसभा मतदार संघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात चालू आहे.

सध्या सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत. माढा लोकसभा मतदार संघातून देशमुखांनी मैदानात उतरावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण यापुर्वीच्या निवडणूकीचा त्यांना अनुभव आहे. लोकमंगलच्या माध्यमातून हि त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे पक्षासाठी माढा लोकसभेची बांधणी करत असतानाच उमेदवारीची माळ सुभाष देशमुख यांच्याच गळ्यात पडणार असल्याची खात्री भाजप कार्यकर्त्यांना आहे.

You might also like
Comments
Loading...