अनिल देशमुख साहेब काल आपल्याकडे काही ‘रिकामटेकडे कॉंग्रेस’वाले आले होते…

मुंबई:आपल्या विशेष भाषा शैलीसाठी प्रसिद्ध असणारे कोकणचे मुलुख मैदान तोफ नारायण राणे यांचे सुपुत्र आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी खास आपल्या भाषेत एक दमदार ट्वीट करून कॉंग्रेस नेत्यांची चांगलीच चंपी केली आहे.

राणे म्हणाले की ‘अनिल देशमुख साहेब काल आपल्याकडे काही रिकामटेकडे काँग्रेसवाले आले होते. संदीप सिंहला मी ओळखत नाही पण त्याच्या सोबत व्यवहार करणं गुन्हा आहे तर ठाकरे कुटुंबातील ह्या सदस्यांची पण चौकशी करावी कारण हे एकत्र स्व. बाळासाहेबांवर चित्रपट बनवणार होते, मी पत्रही पाठवतो आपल्याला.

अशा आशयाचं ट्वीट करून कॉंग्रेसच्या नेत्याची चक्क ‘रिकामटेकडे’ म्हणून अवहेलना केली आहे.आणि सोबतच ठाकरे कुटुंबाला देखील टार्गेट करत एकाच दगडात दोन पक्षी साधण्याचा प्रकार केला आहे.आता यावर कॉंग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-