‘खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आता भाजपात दाखल झाले आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर मुंबईतील गरवारे क्लब येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर. तसेच राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नव भाजप वासियांचे स्वागत केले. तर भाजपात येणाऱ्या नेत्यांची स्तुती केली. तसेच साताऱ्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पक्ष प्रवेशावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष टिप्पणी केली. ते म्हणाले की, शाहू महाराज घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे आधीच भाजपामध्ये आहेत. आणि आज प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भाजपामध्ये दाखल झाले आहेत.

तसेच मधुकर पिचड यांच्या सारखे ज्येष्ठ नेते आज भाजपात आले आहेत. त्यामुळे आता आमच्या मागे थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत. अशा थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभावे यासाठी आम्ही आधी ज्येष्ठ नेत्यांच्या मुलांना पक्षात घेतले. त्यानंतर आपोआपचं ज्येष्ठ नेते देखील पक्षात आले, अशा मिश्कील शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत केले.

पिंपरी चिंचवडप्रमाणे राज्यातील घराणेशाही संपवा : सुभाष देशमुख

मतदारसंघातील कामं न झाल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला, शिवेंद्रराजेंचे स्पष्टीकरण