बलात्कार प्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम दोषी: पंजाब हरियानात तणाव

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असणारे बाबा गुरमीत राम रहीम याला 2002 मधील साध्वींच्या बलात्कार प्रकरणात सीबीआय कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आल आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला .

2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर करण्यात आला होता 2002 मध्ये मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून साध्वीने राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर 24 सप्टेंबर 2002 रोजी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

दरम्यान बाबा राम रहीमला दोषी करार देण्यात आल्यानंतर आता 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान या बलात्कार प्रकरणात बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...